गणपती संपले, पावसाळा संपत आला. सध्या बागेत स्पर्श, रूप आणि गंध अशी तिहेरी मेजवानी आहे … परवा तर चक्क एक फुलपाखरू आलं होतं सातव्या मजल्यावरच्या आमच्या छोट्याश्या गच्चीत! 
या हिरवाईच्या उत्सवाचे थोडे फोटो.
सकाळ सोनचाफ्याच्या घमघमाटाची, दुपार सोनेरी उन्हात चमकणार्‍या पिवळ्या – केशरी एक्झोर्‍याची

संध्याकाळ जाईच्या नाजुक सुगंधाची. पावसाच्या मार्‍यामुळे जाईच्या फुलाने सोनचाफ्याच्या पानाचा आसरा घेतलाय! 

रात्र वेड लावणार्‍या रानजाईची!

गणेशवेलाची नाजुक वेलबुट्टी

राक्षसाचा ब्रह्मराक्षस झालाय …
स्कॉलरही महास्कॉलर बनलाय

हे काय आहे सांगू शकाल? आल्याचा एक कोंब असा झालाय. माझ्या तरी माहितीप्रमाणे आल्याला फुल येत नाही. मग हे काय असावं?

दोन चवळीचे दाणे पेरली होते, त्याचा वेल…